जिल्हा परिषद शाळा वाबळेवाडी-अभ्यास दौरा*
दिनांक १५/११/२०१९
अहवाल लेखन
(भाग १)
*उद्दिष्टांनुसार शाळाभेट व अभ्यास*
*१.शालेय कामकाज व जबाबदारी वाटप यांचा सूक्ष्म अभ्यास करणे.*
• शालेय कामकाज
• वेळ-सकाळी ९-०० ते दुपारी ३-३०
• कार्यरत शिक्षक
मुख्याध्यापक - १ सहशिक्षक- ११ एकूण १२
• पट -६५०
--------------------------------------------------------------------------
• मुख्याध्यापक व सहशिक्षक हे सर्वच एकाच पातळीवर राहुन समान जबाबदारीने कार्यरत आहेत. त्यामुळेच दुपारपर्यंत यांपैकी मुख्याध्यापक कोण सहशिक्षक कोण वा पालक कोण आहे ? हे आम्हास कळले नाही ! एवढेच नव्हे तर मा. शिक्षणसचीव नंदकुमारसाहेब यांनी 'शिक्षण सचीव' ही ओळख लपवून ठेवून सामान्य शिक्षकांप्रमाणे बावळेवाडी शाळेस बहुमोल योगदान दिल्याचे मा. सतीशजी वारे हे आदरपुर्वक गौरवाने सांगतात. यावरुनच एखादी संस्था एवढी नावारुपाला कशी येते याचे गमक सापडते !
• एकमेकांचा समान आदर ठेवून कामे केली जातात.
• विद्यार्थ्यांच्या जिज्ञासूवृत्तीस भरपूर वाव दिला जातो.
• शिक्षक एकमेकांच्या अध्ययन अध्यापनाचे काळजीपूर्वक निरीक्षण करुन नवनव्या बाबी शिकून त्याचा अवलंब करतात.
• एकमेकांना प्रोत्साहित करतात
• फक्त दहावीपर्यंतचे शिक्षण झालेले सतीशजी वाबळे हे ग्रामस्थ शाळेविषयीची अभ्यासपूर्वक व इतरांनाही प्रेरणा मिळेल अशा प्रकारे शाळेची माहिती सांगतात. गावकऱ्यांना शाळेतील शिक्षकांविषयी नितांत प्रेम व आदरभाव दिसून येतो.
*२.शालेय सुधारणेत आर्थिक सहकार्य मिळविण्याबाबतचा वाबळेवाडी पॕटर्नचा अभ्यास करणे.लोकसहभागासाठी केलेल्या प्रयत्नांचा अभ्यास.*
• गावकऱ्यांना शाळेत समानतेची वागणुक मिळल्याने आपलेपणाची भावना वाढीस लागली आहे .त्याचाच फायदा लोकसहभाग मिळवण्यासाठी यशस्वीपणे झाल्याचे मा.वारे सर सांगतात.
• अंगणवाडीसेविका व विशेष शिक्षकांचे मासिक वेतन लोकसहभागातून देण्यात येते. (एकूण - १२,००,००० रु.)
• शाळेसाठी दिड एकर जमिन ग्रामस्थांनी दिली आहे.
• जत्रा,तमाशा असे कार्यक्रम आयोजित न करता त्यावर होणाऱ्या खर्चाची रक्कम शाळेसाठी दिली जाते.
• बचतगटाच्या माध्यमातून होणारा नफा व रक्कम शाळेसाठी वापरली जाते.
• विद्यार्थ्यांच्या वाढदिवशी इतर खर्च न करता पालकांनी आपल्या पाल्यास लॕपटॉप घेऊन दिलेला आहे.
*३.विषयनिहाय कृती व उपक्रमांचा सखोल अभ्यास करणे.*
• वर्ग/ इयत्ता विरहीत अध्ययन अध्यापन रचना
• गुरुकुल शिक्षण प्रणालीचा स्विकार
• अभ्यासक्रम तयार करताना विद्यार्थ्यांच्या मतानुसार /आवडीप्रमाणे लवचिकता
• विद्यार्थी आपल्या आवडीनुसार अभ्यास निवडू शकतात.
• पहिल्या वयोगटातील (इयत्ता फक्त नावापुरती.) विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर अतिशय सुरेख व प्रमाणबद्ध आहे.
• दुसऱ्या वयोगटातील विद्यार्थी मीलियन,बीलीयन , ट्रीलीयन पर्यंतच्या संख्यांचे वाचन अचूकपणे करतात.
• विद्यार्थी स्वतः कविता तयार करतात अशा स्वरचित ४०० कवितांचा संग्रह आहे.
• हावभावांवरुन शब्द/वाक्यवाच
*४.विद्यार्थ्यांना इतर कोणकोणत्या संधी मिळतात ते अभ्यासणे.*
• विद्यार्थ्यांना भरपूर प्रश्न विचारण्याची संधी.
• विद्यार्थ्यांना कोणतेही प्रश्न , शंका विचारण्यापासून परावृत्त केले जात नाही.
• सहाव्या इयत्तेच्या/वयोगटाच्या विद्यार्थ्यांना इंजिनियरींग व फाऊंडेशन क्लासेसची सुविधा.
• साऊंड रेकॉर्डींग, संगीत, वैज्ञानिक अविष्कार
• विद्यार्थ्यांनी स्वतः रोबोट तयार केलेला असून त्याला विविध पारितोषिके प्राप्त आहेत.असा रोबोट करणारी भारतातील सरकारी शाळांमधील एकमेव शाळा.
• दहशतवादी हल्ला प्रतिबंधक रोबोट निर्मिती केली जात आहे.
• ब्राम्ही लिपीचा अभ्यास
• संस्कृत ,जापनीज, फ्रेंच भाषा शिकविल्या जातात.
• विविध गुणदर्शन
• क्रीडा
५. *देशभरात नावलौकिक असणाऱ्या ह्या शाळेतील वेगळेपणाचा अभ्यास.*
• स्वीडनच्या शाळेशी संलग्न .
• शाळेची इकोफ्रेंडली,चाईल्डफ्रेंडली, हवेशीर' मुबलक प्रकाश असणारी इमारत .
• विषय मित्र- शाळेतीलच विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांना विविध विषयातील असणाऱ्या अडचणी संदर्भात मार्गदर्शन करतात.
• पाचगणीच्या धर्तीवर रेनवॉटर हार्वेस्टींग प्रणाली.
• गुरुकुल पद्धतीचा स्वीकार .
• एकाच पाठ्यपुस्तकातून विविध विषयांचे अध्ययन अध्यापन, एकात्मिक शिक्षणपद्धती.
• दर आठवड्यातून एक दिवस शाळेतीलच १२ विद्यार्थी शालेय प्रशासन सांभाळतात. दरवेळेस विद्यार्थी बदलून हा अनुभव दिला जातो.
• वाबळेवाडी व्यतिरिक्त इतर गावातील ५५० विद्यार्थी शाळेचा नावलौकिक व वैशिष्ट्यपूर्ण शिक्षणामुळे दाखल झाली आहेत.
*****************************
*(भाग २)*
*भेटीनंतर*
*१.मी काय शिकलो?*
• एकाच पाठ्यपुस्तकातून अनेक विषय शिकवता येतात.
• विद्यार्थ्यांना संधी दिल्यावर, त्यांच्यावर विश्वास ठेवल्यावर अनेक असाध्य वाटणाऱ्या बाबी सहजशक्य होतात.
*२.मी माझ्यात व माझ्या सहकारी शिक्षकांत काय बदल घडवू शकतो?*
• खैरगाव शाळेची शैक्षणिक व भौतिक गुणवत्ता वाढवून महाराष्ट्रातील प्रयोगशील शाळांच्या यादीत आपणही आपली शाळा एक नावीन्यपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण बनवून स्थान मिळवू शकतो. Yes We Can !
*३.माझ्या शाळेत मी कोणते बदल घडवू शकतो?*
• न्युजरुम निर्मिती
• क्रोमा इफेक्ट रुम
• इंग्रजी , विज्ञान प्रयोगशाळा
• Skill Development Room
• ART ROOM
• शुज रॕक
*४.विविध घटकांचा शालेय गुणवत्ता विकासात कसा उपयोग करुन घेऊ शकतो?*
• समान घटक एकत्रित करुन अध्ययन अध्यापन
• स्वयंअध्ययनात वापर
********************************
श्रेयनामावली
सतत कार्यप्रवण राहुन आम्हा शिक्षकांना त्यांच्या समपातळीवर जाऊन प्रेरणादायी मार्गदर्शन करणाऱ्या
आदरणीय भुवनेश्वरी मॕडम,
मुख्य कार्यकारी अधिकारी,नाशिक
तसेच..
शिक्षणाविषयी व शिक्षकांविषयी आदर , अधिकार/पद बाजूला ठेवून शिक्षकांचीच बाजू मांडणाऱ्या, अभ्यासू ,सतत नावीन्याची ध्यास घेऊन शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या नाशिकच्या
शिक्षणाधिकारी मा.वैशाली वीर मॕडम यांनी
सदर दौऱ्यास जाण्याची व नवे अनुभव घेण्याची संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल मी सदैव ऋणी आहे.
व
सरतेशेवटी...
या अभ्यासदौऱ्यात सहभागी असणाऱ्या सर्व उपक्रमशील शिक्षकांच्या गाठीभेटीतून व शैक्षणिक अनुभवांच्या आंतरक्रीयेतून आपल्यातही ध्येयवेड्या शिक्षकांची बिलकुल वाणवा नाही याचे मनस्वी समाधान वाटले ! आजवर फक्त व्हर्च्युअल भेटी झालेल्या त्या सर्वच सहप्रवाशांना धन्यवाद आणि पुढील शैक्षणिक प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा !
*अहवाल लेखन*
विलास गवळे
पदवीधर शिक्षक,जि.प.शाळा खैरगाव, ता.इगतपूरी, जि. नाशिक
शिक्षणपर्व एक शैक्षणिक ब्लॉग
http://shikshanparv.blogspot.com/p/blog-page_27.html?m=1
युट्युब चॕनल
https://www.youtube.com/channel/UCH8TsJW-fN0K2H4yPA5P6pw?view_as=subscriber