----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
शब्दांकन - विलास गवळे, पिंपळद (ना)
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पिंपळद आणि तिरडशेतच्या विद्यार्थ्यांनी अतिशय छान प्रसंगाचा अनुभव घेतला .....
निमित्त होते जलसंपदा विभागाचा 'जलजागृती सप्ताह' कार्यक्रम !
याअंतर्गत दि. २२/३/२०१६ रोजी जलदिंडी व शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये तिरडशेत तसेच पिंपळद च्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील सुमारे ५० मुलींना सहभागाची सुवर्णसंधी मिळाली .
...सकाळी बरोबर ८-०० वा. जलसंपदा विभागाने मुलींना घेण्यासाठी खास बस पाठवली. मुलींचे लेझिम पथक, तसेच कलशधारी पथक आणि काही शिक्षक यांना घेऊन ती सिंचनभवन नाशिक येथे रवाना झाली .
अतिशय छान नियोजन आणि उत्तम व्यवस्था अनुभवून मुली मनोमन सुखावल्या ! रंगीबेरंगी कपडे परिधान केलेले अन्य पथके , ढोल ताशा ...सारेच छान !
सकाळी १०-००वा. जलदिंडीचे उदघाटन झाले. नाशिक पंचायत समितीचे मा.गटशिक्षणाधिकारी शहारे साहेब याप्रसंगी उपस्थित होते.
सर्वात पुढे राहण्याचा मान लहान मुलींना अर्थातच पिंपळद आणि तिरडशेतच्या लेझिम , कलशधारी पथकाला मिळाला . ढोल ताशांच्या गजरात लेझिमपथक ताल धरु लागले ...डोक्यावरील कलशात ' पाणी अडवा पाणी जिरवा.' ' Save Water Save Earth' 'वाचवाल पाणी वाचवील पाणी ' अशी घोषवाक्ये घेऊन हिरव्या साड्या परिधान केलेल्या मुली उपस्थितांना तसेच रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना पाणी बचतीचा संदेश देत कालिदास कलामंदिराकडे हळुहळू चालू लागल्या ...जलसंपदा विभागाचे सर्व मान्यवर अधिकारी कर्मचारी रस्त्याने चालत असणाऱ्या मुलींची अतिशय जबाबदारीने काळजी घेत असल्याचे पाहुन शिक्षकांचा हुरुप दुपटीने वाढला .....रस्त्यात ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करुन देण्यात येत होती .
पाठीमागे जलसंपदा विभागाच्या अधिकारी तसेच कर्मचारी वर्गाचे शिस्तबद्ध लेझिम पथक डोळ्याचे पारणे फेडत होते ! वाटेतच महिरावणी बीटाच्या विस्ताराधिकारी मा.चव्हाण मँडम शुभेच्छा देण्यासाठी आल्या .
अखेर कालिदास कलामंदिर आले . या अतिशय महत्वाच्या अशा कार्यक्रमाचा समारोप याच ठिकाणी होणार होता.
मुलींनी " सर , आम्हाला कालिदास कलामंदिर आतून बघायचे !"असा गोड हट्ट शिक्षकांकडे धरला . जलसंपदा विभागाने नाश्त्याची सोय उपलब्ध करुन दिली होती तो घेऊन आम्ही सारे कालिदास कलामंदिरात गेलो ..पाण्याची बचत ही काळाची गरज आहे ...हे स्टेजवर आपल्या भाषणातून सांगणारी एक दुसऱ्या शाळेतील एक छोटीशी मुलगी काय धिटाईने बोलत होती ! ..... याशिवाय विविध पथनाट्य,एकपात्री प्रयोग यांच्या माध्यमातून जल जागृती करण्यात आली.
हा सारा अनुभव आणि कालिदास मधील AC चा गारवा अनोखा असल्याचे मुलींच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते !
.....परतीच्या प्रवासात एकमेकींशी आजच्या प्रसंगाबाबतीतील गप्पागोष्टींमध्ये त्या अगदी गढून गेल्या !
पाणी बचतीचा महान संदेश देण्यासाठी अतिशय चांगल्या कार्यक्रमाचा एक भाग होता आले याचे मनस्वी समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर विलसत होते ...
🏻या कार्यक्रमात सहभागाची संधी ज्यांच्यामुळे प्राप्त झाली त्या तिरडशेतच्या मुख्याध्यापिका श्रीमती स्वाती वानखेडे यांचे पिंपळद शाळेतर्फे मनःपूर्वक आभार !
🏻ज्यांनी या कार्यक्रमात अतिशय छान सुविधा पुरविल्यात त्या वरिष्ठ अधिकारी मा.सहाणे मँडम, Jarande mam तसेच इतर सर्व मान्यवर अधिकारी,कर्मचारी यांची पिंपळद शाळा ऋणी आहे.
🏻ज्यांनी अतिशय छान आणि सुरक्षितपणे प्रवासाची जबाबदारी पार पाडली त्या मा.लोखंडे साहेब , वाहनचालक देशमुख साहेब यांचे मनःपूर्वक आभार........
🏻
🏻
🏻
🏻
🏻
🏻
🏻
🏻धन्यवाद !